भोसरी प्रतिनिधी:-
लक्षवेध सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रा. सौ. कविता संदेश आल्हाट यांच्या पुढाकारातून प्रावी महिला बचत गटातील महिलांसाठी भोंडला व सन्मान सोहळ्याचे आयोजन श्री गणेश लॉन्स, भारतमाता चौक, मोशी येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रावी ड्राइविंग स्कूल च्या अध्यक्ष प्रविणा पिल्लई यांनी केले.
महिलांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी बचत गटातील महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी पाहुणे म्हणून ज्यांची प्रमुख उपस्थिती पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यद्याक्षा कविता खराडे, उन्मेष फाउंडेशन अध्यक्ष राखी धर, तसेच मोशी गावातील मनीषा गव्हाणे , ज्योती आल्हाट, आशा मिसाळ, संध्या गावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी लक्षवेध सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प आयोजक प्रा. सौ. कविता संदेश आल्हाट यांनी व्यक्त केला.






























