पिंपरी प्रतिनिधी:-
चिखलीतील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ मोरेवास्तीतील नागरिकांच्या वतीने पार पडला. या रस्त्यावर काही काळापूर्वी स्ट्रोम वॉटर लाईनचे काम पूर्ण झाले होते, मात्र त्यानंतर मनपाच्या वतीने रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे हा मार्ग पूर्णपणे उखडला गेला होता. परिणामी नागरिकांना दररोज खड्डे, धूळ आणि असुविधांचा सामना करावा लागत होता.
या प्रश्नावर यश साने यांनी सातत्याने प्रशासनाशी पाठपुरावा करून अखेर हा प्रश्न मार्गी लावला आहे. आज या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून त्याचा आनंद आणि समाधान म्हणून या भूमिपूजनानंतर मोरेवस्तीतील नागरिकांनी यश साने यांचा सत्कार करून आपुलकी व्यक्त केली. त्यांच्या या स्नेहाबद्दल यश साने यांनी मनःपूर्वक आभारी मानले तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळेच अशा विकासकामांना गती मिळते असे यावेळी बोलताना ते म्हणाले.
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि दर्जेदार मार्ग उपलब्ध होईल. तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वर्गीय दत्ता (काका) साने यांच्या प्रमाणेच अहोरात्र झटणार असल्याचे यावेळी यश साने म्हणाले.