पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक (ACB) कारवाईचीच चर्चा
महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याचे प्रकरण आहे. तक्रारदार यांनी याबाबत एसीबीला माहिती दिली होती. यावरून त्यांना आज पैशांची मागणी करत असताना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
दरम्यान या कारवाईमागील नेमके कारण, चौकशीचे स्वरूप आणि ACB कडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल.






























