पिंपरी प्रतिनिधी :-
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती महोत्सव महाराष्ट्रात नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तसाच तो छत्रपतींच्या जन्मस्थळी म्हणजेच शिवनेरी गडावर देखील शासकीय इतमामात पार पडला या वेळी गडावर अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होतेच पण शासनाच्या वतीने मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, आजी माजी आमदार, खासदार तसेच असंख्य शिवभक्त उपस्थित होते.
सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला परंतु याच कार्यक्रमातील एक फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आता शिवभक्त त्यावर उस्फुर्त प्रतिक्रिया देत असून सर्व शिवभक्तांनी या फोटोतील शिवभक्तावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
आणि ते शिवभक्त दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत शिवजन्मभुमीतील विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे
कोल्हे यांची खासदारकीची पहिलीच टर्म असून त्यांनी पहिल्यांदाच निवडून येत मतदारसंघातच नव्हे तर दिल्लीत ही स्वतः चा असा वेगळा ठसा उमटवला आहे. खासदार कोल्हे हे खासदार होण्या आधी कलाक्षेत्रात ही काम करत होते कलाक्षेत्रात काम करत असताना त्यांनी मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिका केल्या असून त्या प्रेक्षकांना देखील खुप भावल्या आहेत. कलाक्षेत्रात जितक्या आत्मियतेने कोल्हे यांनी त्या भुमिका साकारल्या आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले तितकेच ते खऱ्या आयुष्यात ही शिवरायांचे विचार मांडणारे आणि आचरणात आणणारे शिवशंभू भक्त आहेत. याचे उदाहरण म्हणजे दि. १९ रोजी शिवनेरी गडावरील मानवंदनेचा प्रसंग गडावरील असंख्य शिवभक्त शासकीय अधिकारी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मानवंदना देण्यासाठी स्तब्ध होऊन उभे होते. सर्वांनी छत्रपतींना मानवंदना दिली त्या प्रसंगी मान्यवरांपैकी कोणीही म्हणजे अगदी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी देखील पायातील बूट घालूनच मानवंदना दिली

परंतु शिवजन्मभुमीतील विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे पायातील बूट काढूनच मानवंदनेसाठी उभे राहिलेले दिसले अनेक शिवभक्तांनी प्रसारमाध्यमांनी हा क्षण टिपला काही वेळातच तो फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होऊन शिवभक्तां सोबतच सर्वसामान्य लोक ही त्या बद्दल बोलू लागले शिवशंभूंचा सच्चा मावळा, छत्रपतींच्या विचारांचे पाईक म्हणून सर्व स्तरातील लोकांनी खासदार कोल्हे यांचे कौतुक केले तर शासकीय अधिकारी आणि मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना विचारणा ही केली की हेच का तुमचे शिवशंभू प्रेम….?
छोट्या पडद्यावरील भुमिका करणारे म्हणून विरोधकांनी अनेकदा खासदार कोल्हे यांच्यावर खालच्या स्तरावर टीका ही केली पण शिवशंभूच्या विचारांचे पाईक असलेल्या अमोल कोल्हे यांनी त्यांच्या टीकेला भीक घातली नाही.

जितक्या वेळेस विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली तितक्या वेळा कोल्हे यांनी अजून आत्मीयतेने मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्याचेच फलित म्हणजे पहिल्याच टर्म मध्ये सलग तीन वर्षे संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळेच विरोधी पक्षाचे खासदार असुनही पहिल्या टर्म मध्ये दोन वर्षे तर कोविड १९ मुळे सर्वच लोक घरात बंदिस्त झाले होते फक्त तीन वर्षे प्रत्यक्षात काम करण्याची संधी मिळाली तरीही न डगमगता कांदा निर्यात बंदी, रेडझोन, पुणे नाशिक रस्ता रुंदीकरण, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प, पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी संसदेत आवाज उठवला आणि देशाचे लक्ष वेधित सर्वात जास्त विरोधात बोलणारे खासदार असूनही मा.नामदार शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातून ४७,००० कोटी रुपयांचा निधी स्वतःच्या मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी मंजूर करुन आणून प्रशासनाकडे पाठपुरावा करून गेली पंधरा वर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. आणि त्यात ते यशस्वी देखील झाले शिरुर लोकसभा मतदारसंघांचा बुलंद आवाज म्हणून दिल्लीत ठसा उमटविला आहे.































