पिंपरी प्रतिनिधी:-
मा.नगरसेवक शांताराम कोंडीबा भालेकर यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तळवडे ज्योतीबानगर येथील स्पार्कल कॅण्डल कंपनीतील दुर्घटना ग्रस्तांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली असून कंपनीत लागलेल्या आगीत मृत व जखमी झालेले रमा देवेंद्र आबदार ,पुनम अभय मिश्रा, लता भारत दंगेकर, मंगल बाबासो खरबडे, कमलादेवी सुरज प्रजापती,राधा सयाजी गोधडे, कविता गणेश राठोड, शिल्पा गणेश राठोड, प्रियंका अमोल यादव, अपेक्षा अशोक तोरणे, प्रतीक्षा अशोक तोरणे, सुमन सयाजी गोधडे, कमल गणू चौरे, उषा सिताराम पाडवी आणि रेणुका मारुती ताथोड (जखमी) यांच्या कुटुंबास १ लाख रुपये असे एकूण १५ कुटुंबीयांना तब्बल १५ लाख रुपयांची आर्थिक मदत मृतांच्या कुटुंबीयांना लोकवर्गणीतून रोख स्वरूपात देणगीदार, उद्योजक व मान्यवर यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आली.

या प्रसंगी संगीता भालेकर, के.डी. वाघमारे, सुजाता काटे मामी, शितलताई वर्णेकर, विठ्ठल निवृत्ती भालेकर, अरुणदादा थोपटे, देवी इंद्रायणीचे बिर्जे साहेब, रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे मा.अध्यक्ष वसंत पतंगे गुरुजी, घरजाईमाता ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष गौतम मोकाशे यांनी मनोगत व्यक्त केले.
भोसरी विधानसभेचे आमदार पैलवान महेश दादा लांडगे यांचे बंधू कार्तिक सर लांडगे यांनी बापू हे माझ्याकडे आल्यानंतर वार्डातील समस्या घेऊन येत असतात एक समस्या सोडवून झाल्यानंतर पुढील दोन समस्या त्यांच्याकडे तयार असतात अशा प्रकारे वार्डातील त्या समस्या तळमळीने सोडून घेण्याचा पाठपुरवठा करून समस्या मार्गी लावतात .
शांताराम बाप्पू भालेकर यांनी आपल्या प्रस्ताविका मध्ये वाढदिवसाच्या औचित्य साधून कुठल्याही प्रकारचा ऑर्केस्ट्रा व इतर मनोरंजनाचा कार्यक्रम टाळून, आपण समाजकार्य करत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही संकल्पना डोळ्यापुढे ठेवून दुर्घटनेतील कुटुंबीयांच्या वारसांना लोकवर्गणीतून आर्थिक मदत देण्याचा मानस पूर्ण केला.
या कार्यक्रमास उपस्थित मावळ लोकसभा मतदारसंघाचे महासंसदरत्न खासदार मा.श्रीरंग आप्पा बारणे, भोसरी विधानसभेचे आमदार पै.महेशदादा लांडगे यांचे बंधू कार्तिक सर लांडगे, मा.महापौर नितीनआप्पा काळजे, मा. महापौर राहुलदादा जाधव, मा.नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मा.नगरसेवक प्रशांत शितोळे, मा.नगरसेवक नारायण बहिरवडे, मा.नगरसेवक कुंदनशेठ गायकवाड, स्वी.नगरसेवक पांडुरंग भालेकर, तळवडे गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग, सर्व ज्येष्ठ नागरिक व त्याप्रमाणे महिला-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.























