चिंचवड प्रतिनिधी:-
नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी खास दिपावली निमित्त भव्य प्रदर्शन व खरेदी-विक्री असे स्टॉल्स मोफत उपलब्ध करून दिले असून या प्रदर्शनात साधारण दीडशे स्टॉल्स लावण्यात आलेले आहे. या प्रकारचे आयोजन नगरसेवक सुरेश भोईर हे गेले आठ वर्षापासून करत आहेत. दिवाळीनिमित्त शुभेच्छा वस्तू आकाश कंदील, दिवे, फराळ, कपडे, इमिटेशन ज्वेलरी तसेच महिलांनी बनवलेले घरगुती पदार्थ जसे की वडापाव थालीपीठ पाणीपुरी भेळ केक्स वेस्टीज व नवीन्यपूर्ण पदार्थ असे अनेक प्रकारचे स्टॉल तिथे उपलब्ध आहेत.
या प्रदर्शनाचे उद्घाटन विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, याप्रसंगी, नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर , माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, महामंत्री मधुकर बच्चे, उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजित कुलथे, कामगार नेते अंबर चिंचवडे, हेमंत डांगे, रवींद्र प्रभुणे, दिपाली कलापुरे, सोना गडदे, रेखा जाजू, मिनाक्षी इंगळे व इतर प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली. धकाधकीच्या आयुष्यात पिंपरी सारख्या ठिकाणी गर्दीत जाऊन पार्किंगच्या समस्यांना तोंड देऊन ज्या लोकांना दिवाळी खरेदी करावी लागत होती तो नागरिक वर्ग अत्यंत समाधानी असल्याचे नागरिकांनी सांगितले. शिवाय लोकल टू व्होकल या मोदीजींच्या आव्हानालाही नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या माध्यमातून मुर्त रुप देण्यात आले. लहान मुलांसाठी अनेक प्रकारचे खेळणी त्याच्या निदर्शनात उपलब्ध असल्याने तसेच त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला मिळाल्याने प्रभागातील लहान मुले ही खुश आहेत. हे प्रदर्शन टोटल तीन दिवसासाठी असल्याने नागरिकांनी खरेदीचा मनमुराद लाभ घेतला.






























