पिंपरी प्रतिनिधी:-
दिपावली स्नेहमिलन मेळावा शालिमार बँकेट हॉल या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मात़ंग संघाच्या वतीने आमदार अमित गोरखे यांचा उपवर्गीकरण तातडीने लागू होण्या कामी दिवंगत क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले आझाद मैदान मुंबई या ठिकाणी यशस्वी मोर्चा पार पाडल्या बद्दल भगवी शाल घालून सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मात़ंग संघ महीला आघाडी प्रदेश अध्यक्ष उषामाई कांबळे, शिवशाही शासन पक्ष पदवीधर प्रदेश अध्यक्ष प्रा उत्तम सकटे, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व अध्यक्ष नानासाहेब कांबळे,अश्विन कांबळे, जेष्ठ नेते भगवान शिंदे, हनुमंत नाना कसबे, सुनील भिसे, प्रा धनंजय भिसे, शिवशाही शासन पक्ष मा अध्यक्ष धनंजय ढावरे, संतोष कांबळे, शिवशाही शासन पक्ष प्रदेश अध्यक्ष कृष्णा साबळे, शिवशाही माथाडी कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष सचिन दोनगहू, विजय देवरे ,नेताजी शिंदे, नगरसेवक बापू घोलप, शिवाजी चव्हाण,आकाश घोलप,मोहन भिसे,
तसेच आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती अध्यक्ष अशोक लोखंडे, सकल मातंग समाज कार्याध्यक्ष अनिल हतागळे, आदी राज्य भरातून मातंग समाज बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.































