पिंपरी:-
पिंपरी वाघेरे परिसरातील डेअरी फार्म येथील रेल्वे क्रॉसिंगवरील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार असून हा पुल वाहतूकीसाठी खुला होणार आहे. या उड्डाणपुलामुळे परिसरातील रेल्वे मार्गावर निर्माण होणारी गंभीर वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार असून, नागरिकांचा प्रवास अधिक जलद व सुरक्षित होणार आहे.
पिंपरी मिलिटरी डेअरी उड्डाणपूल पुलाची सुरुवात नगरसेविका सुनिता राजेश वाघेरे यांनी २०१२ ला तत्कालीन आयुक्ता़कडे उड्डाण पुलाची प्रथम मागणी केली तसेच माजी नगरसेविका उषा वाघेरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्याकडे डेअरी फार्म उड्डाणपूल व्हावा यासाठी पत्राद्वारे मागणी केली होती. नगररचना विभागाकडे उड्डाणपुलाच्या जागेसाठी प्रयत्न केले,त्यांच्या मागणीनुसार महापालिकेने संरक्षण विभागाशी पत्रव्यवहार करून तेथील ८०८१.३१ चौरस मीटर आवश्यक जागेची मागणी केली. या जागेच्या मोबदल्यात संरक्षण विभागास २ कोटी ८६ लाख ८७ हजार ५५० रुपये देण्याची तयारी महापालिकेने दर्शवली होती. २० नोव्हेंबर २०१२ रोजी यासंदर्भात स्टेशन हेडक्वार्टर खडकी (आर्मी) यांना कळविण्यात आले होते व १ एप्रिल २०१३ रोजी हा विषय स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी मांडण्यात आला होता, त्यावेळी सुनीता वाघेरे या स्थायी समिती सदस्या होत्या.
२०१७ ला संदीप बाळकृष्ण वाघेरे हे पिंपरी गावातून नगरसेवक म्हणून निवडून आले, त्यानंतर या पुलाच्या कामासंदर्भात संदीप वाघेरे यांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न सुरू केले त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे उड्डाणपूलाचे काम मार्गी लागले व ते आता पूर्णत्वास आले आहे
संरक्षण विभागाकडून महापालिकेला जागा ताब्यात मिळण्यास उशीर झाल्यामुळे कामाला उशीर झाला होता परंतु उशीर का होईना काम मार्गी लागलेली आहे त्यामुळे परिसरातील नागरिक वाहतुकीच्या समोरच्यातून मुक्त झालेत.
सदर प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. ३१ मार्च २०२३ रोजी पुलाचे काम सुरू करण्यात आले,तांत्रिक बाबी व विविध परवानग्यांमुळे मूळ मुदत (३१ मार्च २०२५) नंतर ३० नोव्हेंबर २०२५ व त्यानंतर ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्या या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हा पूल सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
या प्रकल्पामुळे पिंपरीगांव आणि आसपासच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून परिसरातील वाहतुकीस नवी गती मिळणार आहे, माजी नगरसेविका सुनीता वाघेरे यांनी पाहिलेले स्वप्न विद्यमान नगरसेविक संदीप वाघेरे यांनी पुर्ण केले असेच म्हणावे लागेल.






























