पिंपरी प्रतिनिधी :–
पिंपरी विधानसभा मतदार संघात संत तुकाराम नगर मध्ये म्हाडाच्या चाळीस वर्षे जुन्या झालेल्या ९४१ घरांचा पुनर्वीकास करण्याचे कार्य कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांनी हाती घेतले आहे त्या बद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो तसेंच त्यांनी या गाळे ९४१ गाळे धारकांना एकत्र आणून या घरांची ” संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्था ” नावाने सोसायटी स्थापन केली त्यांचे आज उदघाटन झाले असे मी जाहीर करतो असे गौरव उदगार सोसायटी च्या भव्य मेळाव्यात विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी काढले.
४० वर्षे म्हाडाच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना आता त्यांच्या हक्काचे, सुसज्ज आणि फॅसिलिटीयुक्त घर मिळणार आहे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे,” असे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले.संत तुकाराम नगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित (९४१ गाळे) संस्थेच्या उद्घाटन व नागरी सत्कार सोहळ्या प्रसंगी संत तुकाराम नगर येथे (दि.१८) ते बोलत होते.
या कार्यक्रमाला माजी खासदार अमर साबळे, आमदार अमित गोरखे, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांचे प्रतिनिधी दत्तात्रय भालेराव,सुरेखा जगदाळे, नंदू कदम यांच्यासह गृहनिर्माण संस्थाचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बनसोडे म्हणाले की,“संत तुकाराम नगरमधील या घरांच्या करिता मागील ४० वर्षांपासून यशवंत भाऊ भोसले संघर्ष करत आहेत. पुनर्विकास होणार असल्यामुळे म्हाडाच्या घरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी आता नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे. आज आम्ही आपल्या साक्षीने या संस्थेचे उद्घाटन करत आहोत, हे माझ्यासाठी गौरवाचे क्षण आहेत.” “या भागातील नागरिक मागील चार दशके अवघ्या ३०० स्क्वेअर फुट जागेत राहतात. आज ज्यांचे वास्तव्य इथे आहे, त्या सर्वांसाठी हे घर म्हणजे केवळ निवारा नाही, तर स्वाभिमानाचे प्रतीक आहे.”योजना पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना सुमारे ९०० ते १००० स्क्वेअर फुटांचे घरे मिळतील. त्याचबरोबर समाजासाठी आवश्यक असणारी मैदाने, मंदिर, बुद्धविहार, सांस्कृतिक व सामूहिक उपयुक्त सुविधा या प्रकल्पात समाविष्ट असतील.घर हे केवळ भिंती नसते, त्यात घरपण असले पाहिजे.“सध्या पिंपरी मतदारसंघात १२ ते १३ एसआरए प्रकल्प चालू आहेत. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना शासनाच्या मार्गदर्शक तत्वांतर्गत लाभ देण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही अडचण किंवा गरज असल्यास ती वेळेत सांगावी. विकासकामांमध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.”अशी भावना श्री बनसोडे यांनी व्यक्त केली.
यशवंत भोसले आपल्या भाषणात म्हणाले की, हा केवळ प्रकल्प नाही, तर संघर्षाचा विजय आहे. आम्ही केवळ इमारत नाही, तर घराची स्वप्ने उभी करतोय. हे घर म्हणजे तुमचं भविष्य आहे.संस्थेच्या सुमारे ७५% सभासदांची नोंदणी पूर्ण झाली असून, लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आमच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पासाठी गेली अनेक वर्षे लढा सुरू होता. त्या प्रयत्नातून आज ९४१ कुटुंबांचे हक्काचे घराचे स्वप्न साकार होत आहे.
दत्तात्रय भालेराव यांनी सांगितले की, “यशवंत भोसलेंनी रक्ताचे पाणी केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे स्वप्न साकार होत आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची म्हाडा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी या परिसरातील अडचणी समजून घेतल्या आणि यासाठी सहकार्य केले.”
अमर साबळे यांनी यशवंत भोसलेंचे अभिनंदन करताना सांगितले, “संघर्षाच्या मार्गातून ही संस्था साकार झाली आहे. प्रत्येक माणसाला घर असावं, ही प्राथमिक गरज आहे. ती गरज पूर्ण होण्यासाठी भोसले यांनी केलेली धडपड वाखाणण्याजोगी आहे.”
आमदार अमित गोरखे यांनी आपल्या भाषणात सांगितले, “घर मिळवण्यासाठी फक्त योजना असून चालत नाही, तर त्यासाठी एका धडाडीच्या नेतृत्वाची गरज असते. यशवंत भोसले यांच्या प्रयत्नांमुळेच हा योग जुळून आला आहे. पिंपरीत आता २२ मजल्यांचे टॉवर उभे राहताना दिसतील.”
कार्यक्रमात अण्णा बनसोडे यांचा सोसायटी चे अध्यक्ष कामगार नेते यशवंत भोसले यांनी संत तुकाराम महाराजांची पगडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इतरही प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.




