चिंचवड प्रतिनिधी –
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेवक विजय शिंदे यांनी केले आहे. रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला नवजीवन देण्याचे पुण्यकार्य आहे. समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत अधिकाधिक नागरिकांनी या सेवाभावी उपक्रमात सहभागी व्हावे आणि “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश कृतीतून द्यावा असे विजय शिंदे म्हणाले.
आपल्या एका रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. चला, विकासाला समर्पित नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त समाजहितासाठी एकत्र येऊया आणि मानवतेची ही साखळी अधिक मजबूत करूया.





























