पिंपरी प्रतिनिधी:-
मोशी कचरा डेपो येथील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पातील इमारत दुर्घटनेबाबत आणि प्रशासनाच्या अक्षम्य निष्काळजीपणाची चौकशी करणेबाबत…महोदय,पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील कचरा डेपो परिसरातील PCMC च्या वेस्ट-टू-एनर्जी (Waste-to-Energy) प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली आहे. ही घडलेली दुर्घटना अत्यंतदुर्दैवी आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणणारी आहे. मुसळधार पावसामुळे प्रकल्पातीलतीन मजली प्रशासकीय इमारतवर कच-याचा ढिगारा व राडारोडा कोसळल्याने सुमारे १६ हून अधिककामगार व नागरिक इमारतीत अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.सध्या तिथे अग्निशमन दल आणि NDRF कडून बचावकार्य सुरू आहे. या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, विरोधी पक्ष म्हणून आम्ही प्रशासनाला खालील अत्यंत महत्त्वाचे व जाब विचारणारेप्रश्न विचारत आहोत:१. बायो-मायनिंग निविदेचे काय झाले? कचऱ्याचा ढीग सपाट का केला नाही? मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचीविल्हेवाट लावण्यासाठी आणि तिथले डोंगर सपाट करण्यासाठी काही वर्षांपूर्वी महापालिकेनेकोट्यवधी रुपयांची ‘बायो-मायनिंग’ची निविदा काढली होती. जर कोट्यवधी रुपये खर्च करून कंत्राटदिले होते, तर मगसंबंधित कंत्राटदाराने तो धोकादायक कचऱ्याचा ढीग वेळेत सपाट का केला नाही? वर्षानुवर्षे काम सुरू असूनही कचराकमी का झाला नाही? कचरा डेपोमध्ये बायो-मायनिंगचेकाम वर्षानुवर्षे सुरू असल्याचे कागदोपत्री दाखवले जात आहे. असे असतानाही प्रत्यक्षजागेवर कचऱ्याचा ढीग कमी का झाला नाही? कंत्राटदाराला कोट्यवधीरुपयांची बिले अदा करूनही कामसंथ गतीने का सुरू होते? प्रशासनाचे यावर नियंत्रण का नव्हते? महापालिका प्रशासनाने याबाबतकोणतीही खबरदारी का घेतली नाही? तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे ‘ऑडिट’ का केले गेले नाही?तरी दोन महिन्यापुर्वी याठिकाणी ढिगारा कोसळला होता. परंतुया कडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचे निर्देशनास येत आहे. बॉयोमाईनीक चे काम ज्या संस्थेला देण्यात आलेआहे. त्यांची जबाबदारी होती. त्यांनी सदर ढिगारा पावसाळयापुर्वी इतरत्र हलविण्यातयेणे अपेक्षीत होते. पावसामुळे इमारतीच्या संरचनेवर परिणाम झाला, असे वरवरचे कारण सांगून प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. कचऱ्याचे ढीगवेळीच हटवले गेले असते किंवा यापूर्वीच संभाव्य धोका लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेतली असती तर आज या निरपराध कामगारांचे प्राण धोक्यात आले नसते.आमची आग्रही मागणी आहे की ढिगाऱ्याखालीअडकलेल्या सर्व कामगार कर्मचारी यांना तात्काळ सुखरूप बाहेर काढून त्यांना सर्वोत्तमवैद्यकीय उपचार मोफत देण्यात यावेत. या संपूर्ण प्रकरणाचीवरिष्ठ पातळीवर उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी. बायो-मायनिंगकंत्राटदार आणि संबंधित दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक निलंबनाचीकारवाई करण्यात यावी. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेतयासाठी महापालिकेने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, ही विनंती.कळावे.






















