चिंचवड प्रतिनिधी: –
सामाजिक बांधिलकी आणि लोकसंपर्क वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने युवा नेते विशाल वाकडकर (प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य) यांच्या ३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटप करण्यात आले. अजय कांबळे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. त्याच दिवशी दुपारी २ वाजता वाकड येथे बांधकाम कामगारांना शिधा वाटप करण्यात आले.
३ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता वाकड येथील वाकडकर वस्ती येथे नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जवळपास ३५० नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच २३ रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे. याशिवाय १२० पेक्षा अधिक नागरिकांची रक्तदाब, कॅल्शियम आणि CBC तपासणी करण्यात आली.
त्याच दिवशी दुपारी २ वाजता वाय. सी. एम. रुग्णालय, पिंपरी येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. संध्याकाळी ४ वाजता यमुनानगर, निगडी येथील अपंग पुनर्वसन केंद्रातील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटप करण्यात आले. यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता मातृछाया बालकाश्रम, दिघी येथे मुलांना शैक्षणिक साहित्य आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मंगेश असवले आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून करण्यात आले.
या उपक्रमांच्या पुढील टप्प्यात, १३ एप्रिल २०२५ रोजी दिघी येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचेही आयोजन मंगेश असवले आणि मित्रपरिवार यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
या सर्व उपक्रमांमुळे सामाजिक जाणीवा अधिक दृढ झाल्या असून, विविध समाजघटकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. आयोजकांनी यापुढेही समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.