पिंपरी प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष पदी आमदार अण्णा बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल पिंपरी गाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोंढे तसेच संविधान हौ. सोसायटी, गणेश मित्र मंडळ आणि मोरया मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता जाहिर सत्काराचे आयोजन केले आहे. सदर सत्कार समारंभास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी महापौर संजोग वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी स्थायी समिती अध्यक्ष हिरानंदानी उर्फ डब्बू आसवानी,माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक संदीप वाघरे, मा. विरोधी पक्ष नेता दत्ता वाघेरे, माजी नगरसेवक हरेश आसवानी, पिंपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग ,
माझी स्थायी समिती चेअरमन उषा वाघेरे, माजी नगरसेविका सुनीता वाघिरे मा. नगरसेविका निकिता कदम मा.नगरसेवक रंगनाथ कुदळे,मा.नगरसेवक हनुमंत नेवाळे, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ भुजबळ,माजी नगरसेविका गिरजादेवी कुदळे, माजी नगरसेविका माधुरी मुलचंदानी, मा.नगरसेवक गोरख लोखंडे, ज्योतिका मलकाणी, उद्योजक चंद्रशेखर आहेरराव,
सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे, आनंदा कुदळे, शिधाप्पा पुजारी, मोहन वाळुंजकर, वरिष्ठ पत्रकार सुनील कांबळे, वंचीत बहुजन आघाडी नेते सचिन सोनवणे , सामाजिक कार्यकर्ते नरहरी कापसे, सामाजिक कार्यकर्ते राजाराम कुदळे सामाजिक कार्यकर्ते अमर कापसे, गणेश मित्र मंडळ अध्यक्ष राजेश धोत्रे, अतुल डावरे, मंगेश कुर्ले, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता लोंढे, बापू कुदळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.