मावळ प्रतिनिधी:-
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत १२८ लाभार्थ्यांना मंजुरी पत्रकांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम आमदार सुनील (आण्णा) शेळके जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने राबवण्यात आला.
कार्यक्रमावेळी नबीलाल अत्तार, गणेश तळपे, रूपेश सोनूने, ऋषिकेश गायकवाड व केदार बावरे उपस्थित होते. या उपक्रमामुळे गरजू व ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळणार असून, यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. त्या साठी आमदार सुनिल शेळके यांनी स्वतंत्र यंत्रणा राबविली.
या प्रसंगी लाभार्थ्यांनी प्रशासनाचे व आमदार शेळके यांचे आभार मानले.