पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक १९ च्या मुलामुलींसाठी भव्य किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजय शिंदे युथ फाऊंडेशनचे विजय शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. प्रभाग क्रमांक १९ च्या नागरिकांसाठी या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची माहिती व्हावी तसेच त्यांच्या संवर्धनासाठी युवकांनी पुढे यावे यासाठी या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे असे शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम नावनोंदणी दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ असून स्पर्धा दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर २०२५ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी-चिंचवड लिंक रोड) साई ग्रेस सोसायटी व देवी लिंक सोसायटी समोरील पुलाखालील जागेवर घेण्यात येईल
संपर्क:- ७७७ ६०० २४२४
ऑफलाईन नावनोंदणीसाठी – जनसंपर्क कार्यालय शॉपनं. ३ बी श्रीधर अपार्टमेंट श्रीधर नगर माटे शाळेजवळ, चिंचवड पुणे.
ऑनलाईन नावनोंदणीसाठी पुढील लिंकवर भेट द्या
https://forms.gle/MQC5PXBpBjBKDAL28