पिंपरी प्रतिनिधी:-
महाराष्ट्राने आज एक खंबीर आधार गमावल्यासारखी खोल भावना मनात दाटून आली आहे. राजकारणाच्या गोंधळात, अनिश्चिततेच्या काळात ज्यांच्याकडे लोक आशेने पाहत होते, असे नेतृत्व म्हणजे दादा.
निर्णय घेण्याची अपार ताकद, स्पष्ट आणि ठाम भूमिका, आणि कोणाचाही दबाव न घेता योग्य ते करण्याची हिंमत हे दादांचं वैशिष्ट्य होतं.
“दादा बोलतो तसा करतो” हे शब्द फक्त ओळ नव्हते, तर लाखो कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा विश्वास होता.
शब्दांची भुरळ न घालता, कृतीतून विश्वास निर्माण करणारे, जबाबदारीपासून कधीही न पळणारे असे दादा होते. काळ कठीण होता, आहे आणि राहील…
पण अशा प्रत्येक काळात दादांचं नेतृत्व धैर्य देणारं ठरलं.
त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी उचललेली पावलं, आणि त्यांनी उभा केलेला आत्मविश्वास हे सगळं महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. शेवटी खरंच एकच गोष्ट उरते भाषण विसरली जातात, पण काम बोलत राहतं. आणि दादांचं काम आजही मनात आहे, उद्याही बोलत राहील. महाराष्ट्राचं राजकारण ज्यांच्याविना अपूर्ण वाटतं, ज्यांची उणीव शब्दांत मांडता येत नाही, असे दादा आठवणींत, विचारांत आणि चर्चेत कायम जिवंत राहतील.




