मोशी प्रतिनिधी:-
श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव, कुरूळी येथील बैलगाडा शर्यती चे मानकरी ठरले मा. श्री. लक्ष्मणशेठ सस्ते पाटील मा.नगरसेवक, मा.सभापती क्रीडा समिती, पिं.चिं.महानगरपालिका दिवस भरात सर्वात आतून आलेली बारी म्हणजे घाटाचा राजा २०२२ चे मानकरी ठरले.
घाटात ११ सेकंद ८५ मिली पॉईंट इतक्या सेकंदात बारी भिडवून घाटाचा राजा हा किताब प्राप्त केला व चांदीची मानाची गदा , भव्य दिव्य चषक ,आकर्षक घड्याळ व रोख रक्कम इत्यादींचा मान मिळवला.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील नगरसेवक म्हणून निवडून आलेले लक्ष्मणशेठ सस्ते पाटील हे गेली कित्येक वर्षे शेती सोबतच पशुपालन ही मोठ्या आवडीने आणि प्रेमाने करत आहेत बैलगाडा शर्यती सुरू झाल्यापासून हवेली तालुक्यातील या पठ्ठ्याने जिल्ह्यातील प्रत्येक घाटात आपला वेगळाच ठसा उमटवून शर्यत प्रेमींमध्ये नवीन स्फुरण चढवले आहे.




