पुणे प्रतिनिधी:-
हिंदुस्थानातील पहिल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आज दिवसभर भाविकांसह मान्यवरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
आमदार रोहित पवार यांनी घेतले बाप्पाचे दर्शन
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित (दादा) पवार यांनी सहपरिवार आज श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला भेट देत श्रींचे मनोभावे दर्शन घेतले व आरती केली. यावेळी ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी केले.
तसेच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही घेतले दर्शन, लोकप्रिय अभिनेते हार्दिक जोशी, अभिनेत्री मीरा सारंग, शीतल पाटिल, शैलेश देशमुख तसेच निर्माते किरण कुमावत यांनी देखील श्रींच्या चरणी नतमस्तक होत आरतीचा मान घेतला. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती.






























