पिंपरी:-
भारतीय जनता पार्टीचे नेते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. महेशदादा किसनराव लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या संकल्पनेतून ‘एक सहकारी, एक गाव, प्रत्येक कुटुंबाला आधार’ हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सेवाकार्याच्या प्रेरणेने आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत लाभार्थी कुटुंबाला किमान एक महिना पुरेल इतके धान्य, किराणा व जीवनावश्यक वस्तू असलेले मदत किट वितरित करण्यात येणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांपुरता न राहता, गरजू कुटुंबापर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचविणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील ५१ आदिवासी गावांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रत्येक गावाची जबाबदारी एका सहकाऱ्याकडे सोपविण्यात आली असून, संबंधित गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत मदत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
याबाबत नगरसेवक निलेश मधुकर नेवाळे म्हणाले, “महेशदादांचा वाढदिवस हा आमच्यासाठी सेवेचा दिवस आहे. एक सहकारी, एक गाव या भावनेतून प्रत्येक कुटुंबाला आधार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात सहभागी व्हावे.”
पुढील टप्प्यात इतर गरजू भागातही हा उपक्रम विस्तारण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.































