पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे दिवंगत शहराध्यक्ष स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांची पुण्यतिथी निमित्त भाजपाच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने विद्यमान शहराध्यक्ष नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे यांच्या हस्ते स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले. यावेळी स्वर्गीय अंकुशराव यांना जिल्हा महामंत्री मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, नगरसेवक निखिल बोर्हाडे, चंद्रकांत नखाते, प्रवक्ते राजाभाऊ दुर्गे, संतोष तापकीर, देवदत्त लांडे, रवींद्र देशपांडे, दिलीप राऊत, रविंद्र नांदुरकर, रामदास काळजे, संजय परळीकर, मनीष पंजाबी, नंदूकाका भोगले यांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






























