पुणे प्रतिनिधी : –
खासदार या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे खास – दार हा अर्थ असा का तर जनतेचे प्रश्न ज्या खास दारातून आत गेल्यावरच सुटू शकतात ते म्हणजे लोकसभेच्या सभागृहाचे दार हा अर्थ लावण्यात काहीच वावगे नाही कारण ‘खासदार’ असावा तर डॉ. अमोल कोल्हे यांच्या सारखाच असावा असे आता शिरूर लोकसभेतील जनता बोलू लागली आहे.
सबब गेल्या अडीच वर्षांत केलेली कामगिरी अडीच वर्षांतील दीड वर्ष तर लॉकडाऊन मध्येच गेले कारण संपूर्ण जगच करोनाच्या संकटात सापडले होते या दीड वर्षात खासदारांना ही दोनदा करोना ची बाधा झाली पण हार मानतील ते खासदार कुठले ज्याप्रमाणे निवडणुकीत विरोधकांना धूळ चारली त्याचप्रमाणे करोनाला पळवून लावून मागील एक वर्षापासून मतदार संघातील मायबाप जनतेच्या समस्या कायमच्या सोडवण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस अहोरात्र मेहनत घेणारे खासदार म्हणजे डॉ. अमोल कोल्हे.
खासदारांनी नुसती मेहनत नाही घेतली तर वेळोवेळी लोकसभेच्या सभागृहात बोलण्याची संधी मिळताच तितक्याच ताकदीने जनतेच्या मनातील ज्वलंत प्रश्न सभागृहात विचारले. तितक्याच वेगाने पाठपुरावा करून ही मेहनत फक्त दीड वर्षात सत्यात उतरवण्यासाठी याच जन आशिर्वादाने मिळालेल्या खास – दाराचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी योग्यरीत्या केला. त्याचे उदाहरण म्हणजे फक्त अडीच वर्षांत शिरूर लोकसभा मतदारसंघात सुरू झालेली 27 हजार कोटींची विकासकामे.
दोन सप्टेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खासदारांनसोबत झालेल्या बैठकीत पुणे सोलापूर रस्त्यावर हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांचे प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मनापासून धन्यवाद देत असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव, चाकण, शिक्रापूर, आणि वाघोली ते शिरुर या रस्त्यांच्या कामांबाबत निर्णय सतत बदलले जात असून त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याची बाब केंद्रीयमंत्री गडकरी यांना पत्र पाठवून निदर्शनास आणली होती. या पत्राची दखल घेऊन केंद्रीयमंत्री गडकरी यांनी जलदगतीने निर्णय घेत या सर्व महामार्गांची कामे मार्गी लावली आहेत.
नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड रस्त्याच्या कामासाठी कन्सल्टंन्ट नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या ४ महिन्यात डीपीआरचे काम पूर्ण करण्याचे निर्देश कन्सल्टंन्ट संस्थेला देण्यात आले आहेत, तर तळेगाव चाकण शिक्रापूर आणि वाघोली ते शिरुर या एलिव्हेटेड रस्त्यांसाठी कन्सल्टंन्ट नियुक्तीसाठीची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याचबरोबर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणाऱ्या गंभीर अपघाताची दखल घेऊन हडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्याची खासदार कोल्हेंची ही मागणीही केंद्रीयमंत्री गडकरी यांनी मान्य केली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना या कामाचे नियोजन करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत.
दिनांक दोन सप्टेंबर रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा आढावा घेताना चाकणपासून २७ कि.मी. अंतरावर मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कची घोषणा करीत सर्वच मागण्यांची पूर्तता केली आहे असे म्हणता येईल. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्यावतीने गडकरी साहेबांचे मन:पूर्वक आभारी असल्याची भावना खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.






























