पिंपरी प्रतिनिधी:-
रहाटणी–तापकीर नगर प्रभागातील पाणी समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी नगरसेवक बाबा त्रिभुवन यांनी ऑन फिल्ड प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या प्रभागातील सौंदर्य कॉलनी, साईज्योत कॉलनी, बळीराज कॉलनी, सिंहगड कॉलनी, राजगड कॉलनी व शिवराज नगर परिसरातील कमी दाबाने आणि अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. नळाला येणाऱ्या पाण्याचा दाब, पाणीपुरवठ्याची वेळ आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्यानंतर ‘ड’ प्रभागातील पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचीही पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना पुरेशा दाबाने व नियमित वेळेत पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा विभागाला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यावेळी कार्यकारी अभियंता दीपक करपे, कनिष्ठ अभियंता समीक्षा मालपुरे, अंकुश सईजराव तसेच पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.































