पिंपरी प्रतिनिधी:-
राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या वतीने चिंचवड मतदार संघात नाना काटे यांना उमेदवारी दिली खरी मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांचा स्थानिक नेत्यांवर नेत्यांचा विश्वास नसल्याचे दिसत आहे मावळ व पुणे जिल्ह्यातील नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार हे स्थानिक कार्यकर्त्यांना फोन करत आहेत अजित पवार यांचे खासगी सचिव नगरसेवकांच्या घराबाहेर पहा-यासारखे बसून आहेत.
त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा स्थानिक कार्यकर्त्यांवर भरवसा नाय काय असा खोचक सवाल माजी नगरसेविका मीनल यादव यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने राहुल कलाटे यांचे नाव चर्चेत होते मात्र त्यांना डावलून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली खरी पण आता राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकल्याचे दिसत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विश्वास नसल्याचे चित्र आहे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे स्वतः शहरातील नेते व कार्यकर्त्यांना फोन करत आहेत. पिंपरी चिंचवड मधील नेत्यांपेक्षा पुणे जिल्ह्यातील व मावळातील नेतेच प्रचारात रिमोट कंट्रोल हाती ठेवून आहेत स्थानिक नेते व कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भरोसा नाही हेच सिध्द होते.
उमेदवार अजितदादा पवार ,सुनील शेळके आहेत की नाना काटे …? असा सवालही मीनल यादव यांनी केला आहे.