चिंचवड प्रतिनिधी:-
पुणे जिल्ह्यातील वाकड गावातील मानाची प्रथम बैल जोडी यांचा शाही बैल पोळा वाकड गाव शेडगे वस्ती येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी बैलजोडीचे मालक प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर शेडगे यांचे सोबतच स्वीकृत नगरसेवक गिरीश शेडगे ही उपस्थित होते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२२ ची मानाची बैल जोडी लक्ष्या आणि हिरा यांच्या शाही मिरवणुकी मध्ये वडगाव धायरी येथील अमर ब्रास ब्रँड हे प्रमुख आकर्षण म्हणून बोलावण्यात आलेले होते. पुणे जिल्ह्यातील वाकड गावातील मानाची पहिली बैल जोडी यांचा शाही बैल पोळा वाकड गाव शेडगे वस्ती येथे साजरा करण्यात आला या वेळी प्रमुख उपस्थिती कर्नाटक मधील बैलाचे प्रसिद्ध व्यापारी श्री संतोष कब्बुरे खिल्लार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनल चे प्रमुख सूरज दिघे उद्योजक सागर नाणेकर ह ब प सीताराम मातेरे सचिन परांडे नवनाथ यळवंडे वाकड ग्रामस्थ व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे संयोजन जय भवानी मित्र मंडळाने केले.