पिंपरी प्रतिनिधी:-
कर्नाटक मध्ये काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. कर्नाटक मधील निकाल आज हाती आला त्यामध्ये काँग्रेसने एक हत्ती सत्ता मिळवली त्याचा आनंद उत्सव पिंपरी चिंचवड शहरामध्येही साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकांना पेढे वाटून आनंद उत्सव केला त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताश्याच्या तालावर ठेकाही धरला आज हा विजय हुकूम शाही विरुद्ध लोकशाही असा होता. आज कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला निवडून देऊन हे दाखवून दिलं आहे की लोकशाही अजून जिवंत आहे असे मत यावेळी डॉक्टर कैलास कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.




