चिंचवड प्रतिनिधी:- मा. मंगल प्रभात लोढा मंत्री महोदय,(कौशल्य विकास रोजगार ) यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २२ रोजी नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव. येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने “छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर” पार पडले. या शिबिराचे उदघाटन माननीय आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिबिरात आलेल्या विद्यार्थ्यांशी व पालकांशी करिअरविषयी संवाद साधून मा. आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मा. श्रीमती. निशा कारकिरा (जनरल मॅनेजर, स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रा. लि.), मा. श्री. डी. जी. चौगुले (एच. आर. मॅनेजर, आय जी. डब्ल्यु. पुणे.) व प्रमुख वक्ते म्हणून मा. एच. आर. सुर्यवंशी (तज्ञ प्रशिक्षक, उद्योजकता विकास), मा. भगवान पांडेकर (कलमापन चाचणी तज्ञ), मा. गरदडे साहेब ( उपप्राचार्य, पिंपरी चिंचवड ), मा. शिवाजी चौंडकर (एच आर हेड वर्ल्ड वाईड ऑईल मशीन प्रा.)
“छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर” शिबीराचे उदघाटन आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते संपन्न.




