पिंपरी प्रतिनिधी:-
लोकसभा निवडणूकीचे बिगूल वाजण्या आधी पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पिंपरी चिंचवड ओबीसी मोर्चा महिला अध्यक्षपदी रोहिणी रासकर यांची नियुक्ती केली असून नियुक्ती झाल्याबद्दल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष आणि पुणे मेट्रोचे ब्रँड अँबेसिडर श्री अभय भोर यांनी इंडस्ट्रीज असोसिएशन आणि दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे रोहिणी रासकर यांचे अभिनंदन केले. अभय भोर यांच्या संपर्क कार्यालयात दि.१५ रोजी ओबीसी शहर महिला अध्यक्ष रोहिणी रासकर यांनी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली यावेळी अभय भोर यांनी त्यांना विविध विषयाचे मार्गदर्शन करून पुढील काळामध्ये शहरातील विविध समस्यांवर तसेच ओबीसी समाजासाठी पुढाकार घेऊन उल्लेखनीय कामगिरी करावी यासाठी शुभेच्छा दिल्या.





