चिंचवड प्रतिनिधी:-
“वाढदिवस साजरा करताना समाजाने आपल्याला दिलेल्या प्रेमाची परतफेड जनसेवेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असावा. लोकांच्या समस्या सोडविणे, त्यांच्या गरजांना प्राधान्य देणे आणि लोकाभिमुख उपक्रम राबविणे, हाच वाढदिवस साजरा करण्याचा खरा अर्थ आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेब त्रिभुवन यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला आहे”, अशा शब्दांत आमदार शंकर जगताप यांनी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांना वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या.
प्रभाग क्रमांक २७ रहाटणी–तापकीर नगर परिसरातील नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर अखेर प्रभावी उपाययोजना करण्यात आली आहे. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आणि कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून 200 KVA क्षमतेचे नवीन विद्युत रोहित्र कार्यान्वित करण्यात आले. या विकासकामाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
आमदार शंकर जगताप यांच्या आमदारपदाच्या दोन वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाचे औचित्य तसेच नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील नागरिकांना दिलासा देणारे हे काम पूर्णत्वास आले आहे. आमदार शंकर जगताप यांच्या स्थानिक विकास निधी २०२४-२०२५ मधून DPDC अंतर्गत 200 KVA क्षमतेचे नवीन रोहित्र बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
वृंदावन कॉलनी, साई प्रीतम नगरी, गुरुकुल कॉलनी, सुयोग कॉलनी, प्रभात रोड, रोहित पार्क सोसायटी, पुरंदर कॉलनी, गोविंदधाम सोसायटी, वर्धमान हाईट्स, निर्मलदेव हाईट्स, साई कॉलनी १, २, ३, ४ तसेच साई सागर कॉलनी १, २, ३, ४ या परिसरातील नागरिकांना या कामामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. वीजपुरवठा अधिक स्थिर, सक्षम आणि सुरळीत होण्यास मदत होणार असून, वारंवार होणाऱ्या वीजखंडित समस्येवर मात करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
लोकार्पण सोहळ्यास महावितरणचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, खराळवाडी O&M उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानदेव तरंगे, काळेवाडी शाखेचे सहायक अभियंता सुनील कदम उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक माऊली जगताप, नगरसेविका सविता खुळे, स्नेहल कलाटे, माजी स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, विनोद तापकीर तसेच सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मांजाळ, नरेश खुळे, प्रवीण वाघमोडे, संजय भोसले, मनोज नखाते, राकेश नायर, किशोर वर्मा, दिलीप कुलकर्णी, सुभाष घोडके, आनंद देवडकर, फुलारी काका, शेळके काका, आप्पा नेवसे, बाप्पू झांवरे, राज भोज, धनेश पाटील, उमेश पाटील, नागनाथ फुलारी, चंद्रकांत वलपे, नदाफ यांच्यासह सोसायट्यांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रभागातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामे प्रत्यक्षात आणण्याच्या प्रयत्नांना या कामाच्या माध्यमातून यश मिळाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.































