चिंचवड प्रतिनिधी:-
पिंपरी- चिंचवड शहरातील स्थानिक क्रीडा प्रतिभेला योग्य व्यासपीठ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी आवश्यक सरावाच्या सुविधा आपल्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने कै. मोरू बारणे क्रीडांगणाचा आधुनिक पद्धतीने विकास करण्याचा मानस असून ऑलिम्पिक दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, पिकलबॉल कोर्ट, सिंथेटिक रनिंग ट्रॅक तसेच बहुउद्देशीय क्रीडा कोर्ट उभारण्याच्या अनुषंगाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासमवेत नगरसेवक विश्वजित बारणे यांनी क्रीडांगणाची प्रत्यक्ष पाहणी केली.
तसेच लक्ष्मणनगर येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानाची पाहणी करून नागरिकांसाठी अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा व नूतनीकरणाबाबत चर्चा केली. दोन्ही ठिकाणांच्या विकासासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
केवळ क्रीडांगणाचे नूतनीकरण नव्हे, तर भावी पिढीच्या क्रीडा क्षमतेला आकार देणाऱ्या आधुनिक क्रीडा संकुलाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. असे यावेळी विश्वजित बारणे यांनी सांगितले.
याप्रसंगी उद्यान विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक राजेश वसावे, उद्यान सहाय्यक (वृक्ष संवर्धन) सिद्धेश्वर कडाळे, उद्यान सहाय्यक हनुमंत चाकणकर, उद्यान निरीक्षक प्रसाद रोकडे, विद्युत विभागाचे उपअभियंता शेषेराव शेळके, कनिष्ठ अभियंता पवन दांदळे, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विजय जाधव, उपअभियंता वंदना मोर व कनिष्ठ अभियंता धनाजी नखाते उपस्थित होते.































