पिंपरी प्रतिनिधी:-
सर्व श्री राम भक्तांना कळविण्यात आनंद होतो की दक्षिण मुखी श्री हनुमान मंदिरामध्ये प्रभु श्रीराम दरबार विराजमान होवून प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे, तरी सर्व ग्रामस्थ व भाविकांनी उपस्थित राहावे. दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिरामध्ये होणारा धार्मिक

कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे
बुधवार १०/४/२४ दुपारी. ३:३० वा सायं. ०५:०० वा कर्म प्रारंभ, आरती प्रभु श्री राम शोभा यात्रा रात्री – जलादिवस कर्म प्रारंभ संभव्य मंडळ स्थापना, अभिषेक भगवंताचे स्वप्न, स्थापन विधी, होम, दीपोत्सव आरती रात्री –
धान्यअधिवास गुरुवार ११/४/२४ स.९:००वाजता, शुक्रवार १२/४/२४, स.१०:०० वाजता कर्मआरंभ, संकल्प स्थापित देवाचे पूजन, अभिषेक, प्रतिष्ठा होम, महापूजा, आरती
शुद्ध पक्ष चतुर्थी शुक्रवार १२/४/२४ प्रभु श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा दु. २:३९ वाजता संपन्न होणार आहे.
सायंकाळी 7 वाजता महाप्रसाद.
महाप्रसादासाठी देणगी रोख व धान्य स्वरुपात स्विकारण्यात येईल
तरी वरील सर्व कार्यक्रमासाठी रामभक्तांनी सहभागी होवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर सेवा सामितीची विनंती
समस्त ग्रामस्थ व दक्षिण मुखी श्री हनुमान मंदिर सेवा समिती पिंपरी गाव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.




