पिंपरी प्रतिनिधी:-
सकाळी ७:४७ वाजता वॉकिंग करत असताना निगडीवरून जुन्या मुंबई पुणे हायवे वरून पुण्याच्या दिशेने चाललेली ट्रॅव्हल्सच्या बस वल्लभनगर येथे आली असता बसमधून धूर येताना दिसला त्वरित गाडी कलासागर हॉटेलच्या समोर थांबवण्यात आली, लगेचच मोठी आग बसला लागली घटनास्थळातून मनसैनिक रुपेश पटेकर आणि नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशामक दलाला फोन केला अवघ्या पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर असलेल्या संत तुकाराम नगर येथील केंद्रातून अग्निशामक ची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि बसची आग विझवली बस ही नागपूरची असून बसमधील पॅसेंजर निगडी मध्ये उतरवलेले होते त्यामुळे बस संपूर्ण रिकामी होती पण मोठ्या प्रमाणात बसचे नुकसान झाले आत मधले सीट देखील जळून खाक झाले काचा फुटल्या आणि त्यावेळेस सर्विस रोडच्या गाड्या थांबवण्यात आल्या त्यामुळे थोड्या वेळासाठी ट्रॅफिक जाम झाली ड्रायव्हर गाडीत दोन चालक होते ते बचावले आहेत जीवित हानी कोणतीही झाली नाही.




