चिंचवड प्रतिनिधी:-
राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष पद दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नंतर चिंचवड विधानसभेला मिळाले नाही मात्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाले त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक अजित पवारांसोबत गेले त्यानंतर लोकसभा निवडणूक पार पडली महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आणि महायुतीतील पक्षांनी अजित पवारांवर टिकेची झोड उठवली. तसे पिंपरी चिंचवड मधून अजित पवारांसोबत गेलेले पदाधिकारी, नगरसेवक यांचे धाबे दणाणले आणि दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुन्हा शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला,
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी मतदार संघात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला भोसरी विधानसभेतून तीव्र इच्छूक असलेले अजित पवारांसोबत गेलेले भोसरीचे चार टर्म निवडून आलेले आणि विद्यमान शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या सोबत पंधरा नगरसेवकांनी पुन्हा शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष पद रिक्त झाले असून चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचे नाव आघाडीवर असून भोंडवे यांनी देखील एकदा अपक्ष आणि एक टर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येऊन चिंचवड विधानसभा मतदार संघातील रावेत पुनावळे, किवळे भागाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे तत्कालीन राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार जगतापांनंतर चिंचवड मतदारसंघातील मोरेश्वर भोंडवे यांच्या रूपाने तडफदार नेतृत्व अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे.































