पिंपरी प्रतिनिधी:-
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक होणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. तीनही मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची ताकद आहे. त्यामुळे विधानसभेला शहरात भाजप विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा गट असाच सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. तीनपैकी पिंपरी विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडे यांच्या विरोधात पक्षात तसेच मतदार संघात वातावरण आहे आहे, या विरोधी वातावरणाचा फायदा घेण्यासाठी सगळे इच्छुक एकवटले आहेत २०१९ ला अपक्ष निवडणूक लढवलेले महायुतीतील आरपीआय गटाचे माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, माजी स्थायी समिती सभापती सिमा सावळे, शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार प्रबळ दावेदार आहेत त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले हे देखील इच्छुक आहेत. यांशिवाय शरद पवार गटाचेच सामाजिक न्याय विभागाचे मयुर जाधव इच्छूक आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उपाध्यक्ष सुरेश लोंढे, कॉंग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे हे गेल्या चार वर्षांपासून जोमाने तयारीला लागलेले आहेत.
नुकताच लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडाला. चार जून रोजी निवडणुकीचा निकाल लागला. आता या निकालाच्या आधारे राजकीय आडाखे बांधत सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येत्या सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक अवघ्या दोन-अडीच महिन्यावर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्येही विधानसभेसाठी राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. शहरातील तीनपैकी पिंपरी हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहे. या मतदारसंघात २००९, २०१४ आणि २०१९ अशा आतापर्यंत तीनवेळा झालेल्या निवडणुका अटीतटीच्या झालेल्या आहेत. जय आणि पराजयाचे अंतर अगदी कमी मतांचे राहिले असून आगामी निवडणुकीसाठी या मतदारसंघात अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. भाजप आरपीआय आठवले गटाचे बाळसाहेब ओव्हाळ हे भाजपच्या कमळ चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते ते यावेळी भाजपाच्या चिन्हावर आरपीआय आठवले गटाकडून दावेदार असून त्यांनी उमेदवारी बाबतीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन दिले आहे. पिंपरी विधानसभा निवडणुक लढण्यास इच्छुक आहेत, महिला बचतगटांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले आहेत, त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, तसेच पिंपरी मतदार संघातील आजी माजी राजकीय नेत्यांशी ते उत्तम रित्या संपर्कात आहेत. त्यांनी मागिल २०१९ ची पिंपरी विधानसभा निवडणुक अपक्ष म्हणून लढविली आहे, त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघांची त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे.
माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्या मागे कार्यकर्त्यांची फौज आहे, पिंपरी कॅम्प मधील काही नेते त्यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नात आहेत.
सुलक्षणा शिलवंत यांना मागिल निवडणूकीत थांबावे लागले होते, त्यामुळे यावेळी काही ही झाले तरी त्या लढण्यासाठी तयार आहेत. २०१४ च्या निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून सुरेश लोंढे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी ते इच्छुक आहेत. त्यामुळेच विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना यावेळची निवडणूक सोप्पी राहिली नाही, कारण यावेळी अपक्ष निवडणूक लढवलेले बाळासाहेब ओव्हाळ, माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत हे दिग्गज समोर असणार आहेत.




