भोसरी प्रतिनिधी:-
प्रिस्तीन ग्रीन मोशी येथे राहणारे प्रभाकर गुरव वय ५२ यांनी जागा मालक अतिश बारणे आणि त्यांचे सहकारी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस स्टेशन भोसरी येथे दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. सदर घटना
दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री १० वाजता शंकर मंदिर मोशी येथे घडली. फिर्यादी यांनी तक्रारीत म्हंटले आहे की , प्रिस्तीन ग्रीन डेव्हलपर यांच्या प्रिस्तीन ग्रीन सोसायटीत सन २०१८ रोजी ३३ लाख रुपये किंमतीची सदनिका त्यांनी खरेदी केली. पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी सदर ग्राहक यांनी विकासक आतिश बारणे यांच्या कडे वेळोवेळी मागणी केली. त्यांनी सुध्दा आपण काही दिवसातच तुम्हा सगळ्यांना पार्किंग उपलब्ध करून देऊ असे सांगितले. त्यानुसार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी पार्किंग च्या संदर्भात काही बोलणे करायचे आहे याबाबत सर्व ग्राहक यांना त्यांनी शंकर मंदीर येथे बोलावले. पण चर्चा न करता त्यांनी ग्राहक यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. तुला खूप माज आलाय तुझे पैसे घे आणि निघ असे म्हणत लाकडी काठी, हॉकीने अतिश बारणे आणि सहकाऱ्यांनी मारहाण केली. तदनंतर गुरव तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तक्रार दाखल करण्यात येऊ नये म्हणून राजकीय दबाव टाकला याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात यावी म्हणून न्यायालयात दावा दाखल केला होता. त्या दाव्यावर सदर तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधीत पोलीस स्टेशन यांना देण्यात आले त्यानंतर चार महिन्यांनी दहा ऑगस्टला एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.