पिंपरी प्रतिनिधी:-
मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासंदर्भात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दि.३० रोजी केलेला केलेला खुलासा हा खोटा असून आयुक्त दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष तुषार कामठे यांनी केला आहे त्यांनी आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याचे उघड्यावर अस्ताव्यस्त अवस्थेत अवशेष दिसून आले छत्रपती संभाजीराजे यांच्या पायातील मोजडीला गेलेला तडा त्यांनी फेसबुक लाईव्ह च्य माध्यमातून पुन्हा निदर्शनास आणून दिले तरी छत्रपतींची होणारी विटंबना ताबडतोब थांबली पाहिजे आणि पुतळा सुरक्षित ठेवण्यात यावा तसेच केलेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तुषार कामठे यांनी केली आहे. दोषींवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही कामठे म्हणाले.