पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी यावेळी आपलाच विजयाचा जुना विक्रम मोडून ५० हजारांच्या आघाडीने विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. आसवानी गट पिंपरी कॅम्पमध्ये माझ्यासोबत आहे. आम्ही रोज एकमेकांशी बोलत राहतो. कोणताही संभ्रम निर्माण करू नका. डब्बू आसवानी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत नगरसेवक आणि कार्यकर्ते आहेत. आमचे नेते अजित पवार यांच्या आदेशाचे पालन करणार. नकारात्मक उलट सुलट चर्चेच्या स्वरुपात ज्या गोष्टी समोर येत आहेत, त्याला काही अर्थ नाही. काही संभाव्य उमेदवार मुंगेरीलाल यांचे सुंदर स्वप्न पाहत आहेत असा टोला ही लगावला
एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरून आपल्या विजयाचा दावा करणार्यांना कासव आणि ससा यांच्यातील शर्यतीत जशी अवस्था झाली तशीच अवस्था होईल. ज्या संभाव्य उमेदवाराचा पक्ष आणि चिन्ह माहीत नाही, ज्याला एकाही नगरसेवकाचा पाठिंबा नाही आणि जो विजयाचा दावा करतो तो मुंगेरीलाल यांच्या सुंदर स्वप्नाशिवाय दुसरे काही नाही.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात दोनशे कोटींचा निधी आणून १०० % आमदार निधी खर्च केला असेही अण्णा बनसोडे यांनी सांगितले विकासकामांच्या मुद्द्यावर आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात आपल्या मतदारसंघात सुमारे दोनशे कोटी रुपयांचा निधी आणण्यात यशस्वी झालो. ज्यामध्ये काही भाग केंद्र आणि राज्य सरकारचा आहे. आमदार निधीतील शंभर टक्के निधी विकासकामांवर खर्च केला. राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ हजारो महिला, युवती व युवकांना देण्याचे काम केले. पिंपरी विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे गेली आहे.
मतदारांचा मला चांगला प्रतिसाद, सकारात्मक फीडबॅक
निवडणूक आचारसंहिता जाहीर होताच निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार आहे. सध्या कोपरा सभा आणि सोसायटी बिल्डिंग सभेच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधत आहे. चांगला प्रतिसाद, सकारात्मक प्रतिसाद त्यामुळे यावेळी ५० हजारांहून अधिक आघाडी घेऊन विजयी होणार असा दावा आमदार अण्णा बनसोडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला आहे.































