पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी विधानसभेतील पिंपरी गाव येथील गणेश नगर झोपडपट्टीतील नागरिकांसाठी पहिली एस आर ए प्रकल्पा अंतर्गत इमारत उभी करणारे व झोपडी धारकांना अठरा मजली इमारतीमध्ये फ्लॅट मिळवून देणारे निडर सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपाध्यक्ष सुरेश लोंढे हे पिंपरी विधानसभेचा विकास आणि झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी पिंपरी विधानसभा लढविण्यास मैदानात उतरले आहेत. पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना त्यांच्याच पक्षातील आजी-माजी नगरसेवकांकडून विरोध होऊ लागला आहे आणि त्यातच आता अजित पवार गटाचे उपाध्यक्ष सुरेश लोंढे पुन्हा एकदा पिंपरी विधानसभा लढवण्यास सज्ज झाले आहेत.
सुरेश लोंढे हे पिंपरी येथे गेली ४० वर्षे राहत असून त्यांनी २०१४ मध्ये पिंपरी विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवलेली आहे त्यामुळे त्यांना पिंपरी विधानसभेचा चांगला अनुभव आहे. त्यानंतर संपूर्ण शहर सुरेश लोंढे यांना आमदार म्हणूनच संबोधते आहे त्यामुळेच पिंपरीतील नागरिकांचा त्यांना असलेला पाठिंब्यामुळेच सुरेश लोंढे हे अजित पवार गटाकडून इच्छुक आहेत. सुरेश लोंढे यांचा जनमानसात तळागाळापर्यंत दांडगा संपर्क आहे. पिंपरी विधानसभेचा शहरातील इतर दोन विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत कमी विकास झालेला आहे. त्यामुळे पिंपरीचा सर्वांगीण विकास आणि झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी सुरेश लोंढे कटीबध्द असून केवळ आणि केवळ त्यांच्यासाठीच पिंपरी विधानसभा लढवणार असल्याचे पत्रकारांना सांगितले, पिंपरी विधानसभेतील अरुंद रस्ते, पवना धरण जवळ असून दिवसाआड होणारा पाणीपुरवठा यामुळे जनता वैतागली आहे त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी मला निवडून देण्याचे आवाहन ही सुरेश लोंढे यांनी केले आहे.




