पुणे प्रतिनिधी:-
इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हिरामण भिका खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हिरामण भिका खोसकर यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतनाना सकाळे यांच्यासह डझनभर समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. हिरामण खोसकर यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षात केले स्वागत
खोसकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे नाशिक व परिसरात पक्ष मजबूत होईल, असे सांगून अजित पवार यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. खोसकर यांचा नाशिक विभागात विशेषत: आदिवासी समाजात मोठा दबदबा आहे.
काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी मुंबईत पक्षात प्रवेश केला होता विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर गेल्या काही दिवसांत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला हा दुसरा मोठा प्रवेश आहे.




