पुणे प्रतिनिधी:-
हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे शहराचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तथा माजी महापौर प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त केले. प्रशांत जगताप हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असल्याने आता चेतन तुपे यांना ही निवडणूक सोपी नसणार हे नक्की.
हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप यांच्या विरोधात महायुतीचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार चेतन तुपे हे निवडणूक रिंगणात असतील. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत हडपसर विधानसभा मतदारसंघ होत असून शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे.