मुंबई प्रतिनिधी:-
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघात सुलक्षणा शीलवंत धर यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना अजित पवार गटातील उमेदवाराशी होणार आहे.
पुण्यातील दोन ते तीन जागासंदर्भात उमेदवारांची घोषणा केली आहे. यात खडकवासला मतदारसंघातून सचिन दोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर पर्वती विधानसभा मतदारसंघातून अश्विनी कदम यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवला आहे. परंडा मतदारसंघातून राहुल परांडे यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून अशीच वर गटातील नरहरी झिरवळ यांच्या विरोधात त्यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांचं नाव चर्चेत होतं. मात्र आज जयंत पाटील यांनी नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात सुनीता सारसकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता गोकुळ झिरवाळ पुढे काय भूमिका घेणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसऱ्या बाजूला बीडमधून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातील बागलाण विधानसभा मतदारसंघातून दीपिका चव्हाण यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात माणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभ केले आहे. त्यातच एरंडोल विधानसभा मतदारसंघातून सतीश पाटील तर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यातच आर्वी विधानसभा मतदारसंघातून मयूर काळे या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहे.जुन्नर विधानसभा मतदारसंघातून सत्यशिल शेरकर यांना आज शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. या ठिकाणी त्यांचा सामना अजित पवार गटातील विद्यमान आमदार अतुल बेनके यांस यांच्या सोबत होणार आहे.