पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी विधानसभेची जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आहे. पक्षाकडून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

पिंपरी विधानसभेत तुतारी वाजणार की मशाल पेटणार? यावरून गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अनेक अफवा पसरवत होत्या मात्र या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांकडून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष विरुद्ध शरदचंद्र पवार पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत अशी थेट लढत या मतदारसंघात होणार आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघाची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी नगरसेविका सुलक्षणा धर यांना जाहीर झाली आहे.




