पिंपरी प्रतिनिधी:-
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे. त्यातच इच्छुकांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी आपली वेगळी वाट निर्माण करत मोर्चेबांधणीस सुरुवात केलेली आहे. विधानसभेचा 206 पिंपरी मतदार संघातून निडर सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपाध्यक्ष सुरेश लोंढे हे सुरुवातीपासूनच पिंपरी विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र अजित पवार गटाने त्यांना तिकीट दिले नाही. मात्र आपण ही निवडणूक लढणारच असा निर्धार करत लोंढे यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी बोलताना लोंढे म्हणाले की, जर अजित दादांनी माझा विचार केला असता. मला तिकीट दिले असते तर मी निश्चितच एक लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आलो असतो. तर लोंढे यांच्या कार्यकर्त्यांचीदेखील ही भावना असून, सुरेश लोंढे हेच पिंपरीतून विजयी होतील, असा विश्वासदेखील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
पिंपरी विधानसभेतील पिंपरी गाव येथील गणेश नगर झोपडपट्टीतील नागरिकांसाठी पहिली एस आर ए इमारत उभी करणारे व झोपडी धारकांना अठरा मजली इमारतीमध्ये फ्लॅट मिळवून देणारे निडर सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपाध्यक्ष सुरेश लोंढे हे पिंपरी विधानसभेचा विकास आणि झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी पिंपरी विधानसभा लढविण्यास ठाम आहेत.
फटाक्यांची आतीषबाजी करत राहत्या घरापासून पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे पिंपरी गावातील ग्रामदैवत असलेले भैरवनाथ मंदिर येथे दर्शन व आशीर्वाद घेऊन पुढे पिंपरी पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
पिंपरीचा विकास करण्यासाठी मी जनतेच्या सहकार्याने या ठिकाणी निवडणूक लढवित आहे. अजित दादांनी जर मला तिकीट दिले असते तर मी हजारोंच्या फरकाने मी विजयी झालो असतो. सध्या माझ्यासोबत ४०-५० हजार कार्यकर्ते आहेत. पिंपरी विधानसभेमध्ये विकास झालाच नाही. जे नेते पंधरा वर्षे या ठिकाणी निवडून येताहेत. त्यांनी काहीच विकास केला नाही. लोकांना मोफत घरे देता येत होती. मात्र त्या नेत्यांनी तसे काहीच केलेले नाही. जर निवडून आलो तर नक्कीच या ठिकाणचा शाश्वत विकास करेल असे यावेळी बोलताना लोंढे म्हणाले.
























