पिंपरी प्रतिनिधी:-
नगरसेविका शर्मिला बाबर यांनी प्रभाग क्रमांक १५ मधील जैष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत ७० वर्षांवरील ज्येष्ठांना ५ लाखांचा मोफत विमा मिळणार असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरसेविका सौ. शर्मिला राजेंद्र बाबर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये कॅम्प घेण्यात येणार आहे. सदर कॅम्प दि. ०६ डिसेंबर पासून चालू होणार आहे. तरी प्रभाग क्र. १५ मधील ७० वर्षांपुढील सर्व जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन नगरसेविका शर्मिला बाबर यांनी नागरिकांना केले आहे.
आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. रेशन कार्ड
देशमुख बिल्डिंग, सावरकर सदन शेजारी, एल.आय.जी कॉलनी, सेक्टर नं. २५, प्राधिकरण निगडी – ४४. संपर्क – ९९२२५३२३१२




