पुणे प्रतिनिधी:-
राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समिती पुणे शहर वतीने राजमाता जिजाऊ जयंती लाल महाल येथे साजरी करण्यात आली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊंना हार अर्पण करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक मा. संतोष बारणे, मनपा प्रभारी नगरसचिव योगिता भोसले, मा. नगरसेवक मधुकर जाधव, मंजिरी कोठुळे. डॉ. वैष्णवी किराड, गणेश धावडे, गणेश नलावडे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात काम कारणाऱ्या बारा आदर्श माता व बारा कर्तृत्ववान महिला यांना शाल पुष्पगुच्छ जिजाऊंचे फोटो व सन्मानचिन्ह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच राजमाता जिजाऊंवर शालेय मुलगी सायली बोराडे हिने व्याख्यान केले.
यावेळी मा.संतोष बारणे यांनी आत्ताच्या प्रत्येक महिलांनी जिजाऊचा आदर्श घेतला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमचे आयोजन समिती पुणे अध्यक्ष युवराज दिसले व महिला अध्यक्षा स्मिता पवार उत्सव समिती अध्यक्ष मुकेश यादव. तानाजी शिरोळे सुशील पवार विक्रम सिंह तौर रणजीत बहिरट नारायण घुटे सौ संगीता भालेराव सुभाष जेधे सचिन वडघुले वसंत खुटवड यांनी नियोजन केले प्रास्ताविक तानाजी शिरोळे. सूत्रसंचालन ऍड.संध्या देशपांडे, राहुल तांबे आभार प्रदर्शन वसंत खुटवड यांनी केले बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.




