पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड महापालिका हदीतील चिखली- मोरे वस्ती या भागात मुख्य रस्ते, सोसायट्यांमधील अंतर्गत रस्ते,ड्रेनेज लाईन आदी कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे. या मध्ये अंगणवाडी रस्त्याची स्ट्रॉम ‘वॉटर लाईनचे काम खोळंबले आहे.ते त्वरीत पूर्ण करावे व्याचबरोबर परिसरातील बहुतांश सोसायट्यंमधील रस्यांची दुरस्था झाली आहे. या ठिकाणी रस्ते दुरसती करणे गरजेचे आहे. तसेच काही सोसायटींमधील ड्रेनेज लाईन जुन्या झालेल्या आहेत. त्या बदलून नवीन ड्रेनेज लाईन टाकाव्यात. तसेच काही सोसायटयांमधील ड्रेनेजलाईनची दुरुस्ती करावी.
त्याचबरोबर वाघू साने चौक ते चिचेचा मळा या रस्त्याचे तातडीने डांबरीकरणाचे काम सुर करावे. त्यामुळे अन रस्यांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. मोरेवस्ती भागातील वरील सर्व कामे तातडीने सुरु करुन नागरिकांना होणारी गैरसोय दूर करावी. असे यश साने यांनी पत्रात म्हटले आहे.




