मुंबई प्रतिनिधी:-
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष या पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार आण्णा बनसोडे यांनी अर्ज भरला या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपस्थित होते. बनसोडे यांनी आपला अर्ज विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांचेकडे सादर केला. तीन वेळा पिंपरी विधानसभा मतदारसंघातून बहुमताने निवडून आलेले आण्णा बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात अजित पवारांच्या प्रत्येक निर्णयात खंबीर पणे दादांच्या पाठीशी उभे राहणारे आमदार म्हणून ही लोक त्यांच्या कडे पाहतात.





