पुणे प्रतिनिधी:-
भीमाशंकर सह. साखर कारखान्याने हंगाम २४/२५ चे ऊसाचे बील शेतक-यांना रु.२८००/प्रतिटनाप्रमाणे अदा केले आहे. कारखान्याची एफ.आर.पी. रु.३०७९ / प्रतिटन अशी आहे. उर्वरित रु.२७९/विलंब झाल्यामुळे १५% व्याजासह अथवा हंगाम २४/२५ ची रीकव्हरी १२% येत असून त्यावर एफ.आर.पी.रु.३१४२प्रतिटन येत आहे. त्याप्रमाणे उर्वरीत रु.३५० प्रतिटनाप्रमाणे शेतक-यांना अदा करणेबाबत कारखान्यास दि. २०/०४/२०२५ रोजी लेखी पत्राद्वारे कळविले आहे. तरी कारखान्याने पत्राची दखल न घेतल्याने आपणास विनंती करतो की आपण शेतक-यांना एफ.आर.पी. प्रमाणे रु.२८०० ऍडव्हान्स पेमेंट वजा जाता उर्वरीत रक्कमेवर १५% प्रमाणे होणा-या व्याजासह चौदा दिवसांचे पुढील कालावधीनंतर अदा केलेल्या ऊसबिलावरील रक्कम तातडीने अदा करण्याबाबत कारखान्यास आदेश निर्गमित करावे अशी मागणी देवदत्त निकम यांनी साखर आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.




