पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव कार्यक्रमाच्या आजच्या पहिल्या दिवशी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर मॅडम तसेच जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष विना सोनवलकर, माजी नगरसेवक राजू दुर्गे, सूर्यकांत गोफणे, धनंजय ताणले, महावीर काळे सर, रेखाताई दूधभाते, आदी सर्वांच्या उपस्थितीमध्ये या जयंती महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
खेळ रंगला पैठणीचा या पहिल्या कार्यक्रमाने जयंती महोत्सवांच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली या पैठणीच्या कार्यक्रमांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळेस हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे, धनंजय खुडे, अजय दूधभाते, पोपट हजारे, बिरुवनमाने नवनाथ बीडे, निखिल पडळकर, संजय नायकवडी, भरत महानोर, संतोष पांढरे सोनाताई गडदे, आशाताई काळे राजश्री जायभाय शोभाताई भराडे यशोदा नाईकवडी, तेजस्विनी दुर्गे, प्रतिमा काळे, नवनाथ देवकाते, दीपक भोजने, अभिमन्यू गाडेकर, नरेंद्र चराटे विठ्ठल देवकाते संजय कवितके अजय पाताडे महादेव कवितके महिंद्र बाविस्कर नंदू कदम, देवदत्त लांडे, नीलेश अष्टेकर, नाना कांबळे, मंगेश घाडगे, दीपक भंडारे, श्री ठाकूर आदी सर्वजण उपस्थित होते.
यानंतर शिवदर्शन संचनिर्मित शाहिरी कार्यक्रम पुणे येथील संघाने सादर केला अत्यंत उच्च दर्जाच्या या शाहिरी कार्यक्रमात अनेक प्रकारचे पोवाडे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर गायले गेले त्याला देखील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सायंकाळी सात वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील पुण्यश्लोक हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. हा प्रयोग इतका सुंदर झाला की रात्री अकरा वाजे पर्यंत सुरू असलेल्या या प्रयोगाला अर्धवट सोडून कोणीही जागेवरून हलले नाही. हेच या प्रयोगाचे यश होते. या नाट्यप्रयोगामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे बालपण त्यांचा लग्नाचा विधी त्यांचे पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू अहिल्यादेवींचे राजगादी चालवण्याची पद्धत त्यांनी केलेल्या लढाया आणि शेवटी त्यांचा मृत्यू असा संपूर्ण जीवनपट अत्यंत सुसह्य पणे उलगडला आहे अत्यंत प्रभावी अशा या नाट्यप्रयोगाची सर्वच प्रेक्षकांमधून उत्स्फूर्त अशी दाद देण्यात आली अशा पद्धतीने पहिल्या दिवसाचा जयंती महोत्सवाचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या पार पडला.




