पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या वाढत्या प्रवास गरजा लक्षात घेता, मा. नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (PMPML) पिंपरी गावातून विविध भागांमध्ये बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, पीएमपीएमएल व्यवस्थापकांना पत्र लिहून पिंपरीगाव येथून पुढील भागांमध्ये बससेवा सुरू करण्याची विनंती केली आहे.
१) पिंपरीगाव ते श्री क्षेत्र आळंदी ,(२) पिंपरीगाव ते देहू, (३) पिंपरीगाव ते हिंजवडी, ४) पिंपरीगाव ते बोपखेल (मार्ग – पिंपरीगाव- YCM – नेहरुनगर – भोसरी – दिघी – बोपखेल), ५) पिंपरीगाव ते मनपा भवन, ६) पिंपरीगाव ते राजगुरुनगर, ७) पिंपरीगाव ते निगडी , ८) पिंपरीगाव ते कात्रज, ९) पिंपरीगाव ते हडपसर, १०) पिंपरीगाव ते वाघोली
पिंपरी गाव व परिसरातील शालेय विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध व नोकरदार नागरिकांच्या सोयीसाठी या सेवा अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे वाहतुकीवरचा ताण कमी होईल व नागरिकांना प्रवासात मोठा दिलासा मिळेल.या मागणीसाठी पीएमपीएमएल प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर सेवा सुरु करावी, अशी अपेक्षा वाघेरे यांनी व्यक्त केली आहे.




