पिंपरी प्रतिनिधी –
नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या आयोजनातून पिंपरी गावातील मानाची आणि भव्य दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या सिनेतारका श्रिया सरण, आयशा खान आणि सायली संजीव — ज्यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमात चारचाँद लावले. याशिवाय राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरही उपस्थित होते. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषद आमदार अमितजी गोरखे, उमाताई खापरे, नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे, राहुल कलाटे, हर्षल दोरे, भीमाताई फुगे यांचा समावेश होता.
या मानाच्या दहीहंडीचा थर चेंबूर येथील श्री शितळादेवी गोविंदा पथकाने तब्बल सहा थर लावून फोडला. त्यांच्या या साहसी प्रदर्शनाला उपस्थित नागरिकांनी जोरदार प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना वाघेरे म्हणाले की,
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संदीप भाऊ वाघेरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. उत्साह, संस्कृती आणि एकोप्याचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम पिंपरीकरांच्या आठवणीत कायमचा कोरला गेला आहे.




